बहुजननामा ऑनलाईन
राज्यभरात अनेक ठिकाणी कोरोना बांधित रुग्णांची हॉस्पिटल चालकांकडून लुट होत असल्याच्या अनेक घटना घडत असल्याचे समोर येत असताना यामध्ये पुणे जिल्हा देखील मागे राहिलेला नाही शिक्रापूर ता. शिरूर येथील काही खासगी हॉस्पिटलमध्ये सध्याच्या काळामध्ये कोविड सेंटर सुरु करण्यात आलेले असून या खासगी हॉस्पिटल मधून कोरोना बाधित रुग्णांची मोठ्या प्रमाणात लुट केली जात असून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत.
शिक्रापूर ता. शिरूर येथे काही हॉस्पिटलमध्ये खासगी कोविड सेंटर सुरु करण्यात आले असून येथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना उपचारापूर्वीच दाखल होताना अनामत रक्कम भरण्याचा तगादा लावला जात आहे, त्यानंतर उपचार सुरु असताना रुग्णांना साध्या प्रकारचे मास्क देऊन देखील बिलामध्ये जास्त किंमत लावली जात असून रुग्णांना उपचारासाठी महागडी औषधे आणण्यास भाग पाडले जात आहेत तर काही रुग्णांना व्हेंटीलेटर लावल्याचे दाखविले जात असून रुग्णांना नंतर देण्यात येणारी उपचार फाईल अर्धवटपणे देऊन रुग्णांची पिळवणूक केली जात आहे, तर फाईल साठी संपर्क साधण्यासाठी ठराविक वेळेचे बंधन घातले जात आहेत, काही ठिकाणी रुग्णांचे वाद देखील झालेले असून अनेकांची मोठी पिळवणूक झाल्याचे समोर आले असून काही रुग्णांनी आरोग्यमंत्री, प्रांताधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत, त्यामुळे डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांची होणारी लुट व पिळवणूक थांबणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबत रमेश घोडे उपकोषागार अधिकारी शिरूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले प्रांताधिकारी साहेबांनी आम्हाला चौकशी करण्याबाबत सांगितले होते, त्यानुसार आम्ही तक्रारदार व्यक्तीकडे देखील चौकशी केली आहे, त्यामध्ये शिक्रापूर येथील खासगी हॉस्पिटल कडून ग्राहक रुग्णाला देण्यात आलेल्या बिलाची रक्कम जास्त असल्याचे तसेच रुग्णाची अडवणूक झाली असल्याचे आमच्या समोर आले .
तर शिक्रापूर ता. शिरूर येथील हॉस्पिटलच्या तक्रारी बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्याशी संपर्क साधला असता सदर प्रकाराबाबत तक्रार आलेली असून याबाबत मी आमच्या डॉ. जोशी यांना चौकशीचे आदेश दिले असल्याचे चौकशी नतर पुढील कार्यवाही केली जाईल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.