पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Ganesh Visarjan-2022 | आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस. पुण्यात अत्यंत उत्साहात बाप्पाला निरोप दिला जात आहे. दहा दिवसांच्या सेवेनंतर मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात गणेश मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे (Manache Ganpati) विसर्जन (Pune Ganesh Visarjan-2022) झाल्यानंतर इतर गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होत असतात. पुण्यातील लक्ष्मीरोड परिसरात (Laxmi Road) गणेश भक्तांनी मोठी गर्दी पहायाला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Shiv Sena MLA Aditya Thackeray) हे देखील गणपती विसर्जनासाठी पुण्यात दाखल झाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान आज सकाळीच पुण्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींचं दर्शन घेतले. त्यानंतर आता आदित्य ठाकरे पुण्यात आले आहेत. त्यावेळी तरुणींचा गराडा त्यांच्याभोवती पडला. अनेकजण त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जमलेल्या तरुणी ‘आदित्य आदित्य’ म्हणत जल्लोष करत आहेत. दरम्यान, आज गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक आहे. मी आज राजकारणावर काही बोलणार नाही. (Pune Ganesh Visarjan-2022)
पण महाराष्ट्रातील आजचे राजकारण खूप वाईट असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ते राज्यासाठी, विकासासाठी नक्कीच चांगले नाही. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे वाईट राजकारण होत आहे.
राजकारण खालच्या पातळीवर आले आहे. त्याचा स्तर वरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
नीलम ताई, चंद्रकांत दादा, दादा भेटले, राजकारणाचा विषय झाला नाही. उत्साही वातावरण आहे.
त्यामुळे राजकीय विषय नको, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
Web Title :- Pune Ganesh Visarjan-2022 | The beginning of the Ganesh Visarjan procession in Pune, the joy of youth
हे देखील वाचा :
Mumbai Crime | चक्क मुलानेच बाप्पाला लुटले; गळ्यातील हार चोरुन झाला पसार
Pune Crime | भावाबरोबर लिव्ह इनमध्ये राहणार्या तरुणीला परत पाठविण्यास विरोध केल्याने महिलेला मारहाण
Cardiac Arrest | माता पार्वती बनून नाचणार्या व्यक्तीला आला हार्ट अटॅक… स्टेजवरच मृत्यू, Video