पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Fire News | कोंढवा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील (Dr. Babasaheb Ambedkar Chowk,Kondhwa) एका क्लिनिकला पहाटे आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने तेथे पोहचून काही वेळातच ही आग विझविली. या आगीत कोणीही जखमी झाले नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोंढव्यातील धन्वंतरी क्लिनिकला (Dhanvantari Clinic) आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला
(Pune Fire Brigade) पहाटे 4 वाजून 38 मिनिटांनी मिळाली. अग्निशमन दलाची गाडी तातडीने
(Pune Fire News) घटनास्थळी पोहोचली. तेथे बंद असलेल्या क्लिनिकला आग लागली होती.
पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करताना आग इतरत्र पसरु दिली नाही.
सुमारे 10 मिनिटांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत क्लिनिकमधील संपूर्ण फर्निचर,
इलेक्ट्रीक वायरिंग, मेडिसिन व कागदपत्रे जळून मोठे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
या कारवाईत कोंढवा बुद्रुक अग्निशमन केंद्रामधील (Kondhwa Budruk Fire Station) जवान योगेश पिसाळ,
किशोर मोहिते, रफिक शेख, मदतनीस प्रथमेश निकम, वाहनचालक रवींद्र हिवरकर यांनी भाग घेतला.
Web Title :- Pune Fire News | Fire at clinic in Kondhwa, no one injured
हे देखील वाचा :
Pune Crime | व्यसनी मुलाच्या डोक्यात कुर्हाडीने वार करुन वडिलांनी केला खून, मावळ मधील घटना
Ind Vs Ban T20 World Cup | विराटच्या बॅटिंगवर अनुष्का झाली फिदा, दिली ‘हि’ Reaction