पुणे : बहुजननामा ऑनलाईन – आपण जेवढ्या वेगाने प्रगती करत आहोत, तेवढ्याच वेगाने निसर्गसुद्धा आपला रंग बदलत आहे. परिणामी मागील काही वर्षांपासून संपूर्ण जगासाठी पर्यावरण सर्वात गंभीर मुद्दा बनला आहे. अनेक प्रयत्नानंतर सुद्धा पर्यांवरणचे संतुलन होताना दिसत नाही आणि यामुळे आपले अनेक प्रकारचे नुकसान होत आहे. जगभरात असे अनेक लोक आहेत जे निसर्गाचे सौंदर्य कायम राखण्यासाठी आपल्यापरीने मोठे प्रयत्न करण्यात गुंतलेले आहेत.
काही लोक नद्या वाचवण्याचे काम करत आहेत तर कुणी जंगलतोडीला प्रतिबंध लावण्याचे काम करत आहेत. तर काही लोक प्लास्टिकचा कचरा साफ करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारे पुण्यात राहणार्या पूजा बदामीकर सुद्धा पर्यावरण वाचवण्यासाठी अनोख्या पद्धतीने काम करत आहेत. पूजा बदामीकर यांनी जुन्या टायरपासून फुटवेयर बनवण्याचे काम सुरू केले आहे. पूजा यांच्यानुसार प्रत्येकवर्षी सुमारे शंभर कोटी जुने खराब झालेले टायर काढले जातात.
पूजा यांनी आपल्या या मोहिमेबाबत सांगितले की, मी यावर स्थानिक चर्मकारांच्या मदतीने काम सुरू केले आणि दोन खास प्रकारचे प्रोटोटाइप बनवले. यासोबतच पूजा यांचे खराब टायरपासून फुटवेयर बनवण्याचे काम सुरू झाले. पुण्यात राहणार्या पूजा आपल्या कामाद्वारे लोकांना पर्यावरणविषयी जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पूजा यांच्या या कामातून लोकांना बूट-चप्पल मिळत आहेत, शिवाय शहरात वाढत्या प्रदूषणाला सुद्धा आळा बसण्यास हातभार लागत आहे.
पूजा बदामीकर पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांनी 2018 मध्ये एका आयटी कंपनीचा जॉब सोडून दिला होता. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी नेहमी लोक काही ना काही करतात. हाच विचार करून पूजा बदामीकर सुद्धा पर्यावरण सरंक्षणाबात लोकांना ज्याप्रकारे प्रेरणा देत आहेत ते कौतूकास्पद आहे. एक विशेष गोष्ट ही आहे की, दोन वर्षांपूवी त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला आता लोकांची मोठी पसंती मिळत आहे.