पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | तरूणाने तरूणीच्या कानशिलात लगावून शिवीगाळ करत तिचा विनयभंग (Molestation) केला. ही घटना दिवसाढवळ्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या (Dehurod Police Station) हद्दीत घडली. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षीय पीडित तरूणीने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दीपक सूर्यकांत गावडे Deepak Suryakant Gawde (रा. साईनगर, गहूंजे) वर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
3 नोव्हेंबर दुपारी दोनच्या सुमारास फिर्यादी तरूणी ब्युटी पार्लरच्या कोर्ससाठी पायी जात होती. त्यावेळी दीपक दुचाकीवरून आला आणि त्याने तिला अडविले. तू माझ्याशी का नाही बोलत असे म्हणून त्याने तरूणीच्या थोबाडीत मारले. तिचा विनयभंग केला. तरूणी ओरडू लागल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ केली व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन दीपक तेथून पळून गेला. त्यानंतर तरूणीने देहूरोड पोलीस ठाण्यात दीपक विरोधात तक्रार दाखल केली.
Web Title :- Pune Crime | young girl molested by hitting on face and threatened to kill
हे देखील वाचा :
Abdul Sattar | ‘सुप्रिया सुळे इतकी भिकारXX झाली असेल तर…’, अब्दुल सत्तारांची जीभ घसरली (व्हिडिओ)
Urfi Javed | प्रसिद्ध कॉमेडियनने केली उर्फी जावेद वर टीका; म्हणाला…
Adipurush Movie | ‘आदिपुरुष’ बाबत निर्मात्यांनी घेतला ‘हा’ सगळ्यात मोठा निर्णय