पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | बहिणीच्या मुलाने १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले. त्याचा राग मनात धरुन मुलीच्या वडिलांनी १० जणांना गोळा करुन नातेवाईक महिलेच्या घरात शिरुन महिलेला व तिच्या १३ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन त्यांना अकलुजमध्ये (Akluj) एका खोलीत कोंढून ठेवले. त्यांना मारहाण करुन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न (Attempt To Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी बोपोडीतील (Bopodi) एका ३२ वर्षाच्या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२१/२२) दिली आहे. हा प्रकार बोपोडी तसेच अकलुजमधील राऊतनगर (Raut Nagar, Akluj) येथील घरात १५ ते १६ मार्च दरम्यान घडला होता. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांचे दीर व भावजय असून इतर आरोपी हे त्यांच्या भावजयीचे नातेवाईक आहेत.
फिर्यादी यांच्या बहिणीच्या मुलाने त्यांच्या दीराच्या १६ वर्षाच्या मुलीला पळवून नेले होते. त्याचा राग मनात धरुन आरोपी जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात शिरले.
फिर्यादी, त्यांचे पती व १३ वर्षाच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचा विनयभंग (Molestation Case) केला.
घरातील १५ ते २० हजार रुपये चोरले. फिर्यादी त्यांची मुलगी यांना जबरदस्तीने एका कारमध्ये बसवले.
दत्ता भिंगारदिवे याने फिर्यादी यांच्या गुप्तांगावर हात फिरवून लज्जास्पद वर्तन केले. त्यांना अकलुजमधील एका खोली कोंढले.
त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. भिंगारदिवे याने त्यांच्या मुलीसोबत संभोग करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर महादेव भिंगारदिवे याला कोणाचा तरी फोन आल्यावर त्यांनी दोघींना कारमध्ये बसवून त्यांना खडकी पोलीस ठाण्यासमोरील रणगाड्याजवळील रोडवर सोडून ते पळून गेले.
आरोपीने मुलीला पळवून नेल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | The sister’s son tried to rape the woman and the girl by abducting her in anger
हे देखील वाचा :
Maharashtra Monsoon Session | आमदार महेश शिंदेंनी शिवीगाळ, धक्काबुक्की केली – अमोल मिटकरी