पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Suspicion of character) घेत पत्नीवर वार केल्याची घटना पुणे शहरातील धनकवडी परिसरात गुरुवारी (दि.7) रात्री सव्वा सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक (Arrest) केली आहे. ही घटना (Pune Crime) गुलाबनगर सोसायटीच्या जवळ असलेल्या रिक्षा स्टॅन्डजवळ घडली.
याबाबत 37 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पद्मावती येथे राहणाऱ्या आरोपी पतीवर आयपीसी 307, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल करून अटक केली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे पती-पत्नी असून ते मागील एक वर्षापासून विभक्त राहतात.
आरोपी फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याप्रकरणी महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
याचा राग मनात धरून आरोपीने गुरुवारी रात्री महिलेचा पाठलाग केला. त्यांचे केस ओढून शिवीगाळ केली.
तसेच कोत्याने मानेजवळ वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नलावडे करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Slashing his wife with a spear on suspicion of character; Incidents in Dhankawadi area
हे देखील वाचा :
Pune Congress | ‘सोनिया शक्ती’ विद्यार्थ्यांच्या पंखाना बळ देईल – सतेज पाटील