पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | एका 18 वर्षीय तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट (Half-Naked Photo) करुन तो इन्स्टाग्रामवर अपलोड करुन विनयभंग (Molestation) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी (Pune Crime) नाशिक येथील एका व्यक्तीवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत कर्वेनगर येथील 18 वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.12) कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्य़ाद दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी 354, 354 ड/2, 500, आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे नाशिक येथील रहिवासी असून ते एकमेकांच्या ओळखीचे
आहेत. आरोपीने तरुणीला इन्स्टाग्रामवर (Instagram) मेसज करुन तिचा सोशल मीडियावर पाठलाग केला.
तरुणीचा चेहरा असलेला अर्धनग्न फोटो एडीट करुन तो इन्स्टाग्राम व्हायरल केला.
हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Shocking type in Pune! A half-naked photo with a girl’s face was edited and went viral on Instagram, FIR against the accused in Nashik
हे देखील वाचा :
NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी