Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात लिव्ह अॅन्ड लायसन्स कराराने हॉटेल भाडयाने घेऊन चालविलं जात होतं सेक्स रॅकेट, लोहगाव परिसरातून तिघांना अटक

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | लिव्ह अँड लायसन्स कराराने हॉटेल चालविण्यास घेऊन तेथे वेश्या व्यवसाय करणार्या तिघांना विमानतळ (Viman Nagar Police) पोलिसांनी अटक (Pune Crime) केली आहे.
उदय श्रीरामजी सिंग (वय ३८), विजयकुमार बिहारीलाल गुप्ता (वय २५) आणि चंद्रशेखर विश्वनाथ हेगडे (वय ५४, तिघेही रा. हॉटेल तोरणा बार अँड रेस्टॉरंट, लोहगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वसंत भोजरात शेट्टी आणि प्रदीप नारायण शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगन यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील पोरवाल रोडवर हॉटेल तोरणा बार अँड रेस्टॉरंट लॉज आहे. आरोपींनी हॉटेलचे मुळ मालक दगडु खांदवे यांच्याकडून लिव्ह अँड लायसन्स करारनामा करुन हॉटेल चालविण्याकरीता घेतले. तेथे एका २४ वर्षाच्या महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्याची खात्री केली व त्यानंतर तेथे छापा टाकून तिघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav) तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime | shocking three arrested in lohgaon area for prostitute racket in pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा तेजी, सोनं ’47’ हजार पार; जाणून घ्या
Comments are closed.