पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | सकाळी झालेल्या वादातून रिक्षा चालक (Rickshaw Driver) तरुणाला दारु पिण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन दगडाने तसेच बांबुने मारहाण (Beating) करुन खून (Murder) केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी हडपसर-माळवाडी येथील केशव चौकाजवळ असलेल्या नारळाच्या बागेजवळ घडली आहे. सागर राहुल गायकवाड Sagar Rahul Gaikwad (वय-24 रा. लक्ष्मी माता मंदीर, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात (Pune Crime) घेतले आहे.
याबाबत अक्षदा प्रतिक वाघमारे Akshada Pratik Waghmare (वय-22 रा. शांतीनगर वसाहत, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी कृष्णा विठ्ठल रेखले Krishna Vitthal Rekhle (वय-27 रा. कवडापाट टोल नाका, लोणी काळभोर) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपी कृष्णा रेखले आणि मृत सागर गायकवाड हे दोघे रिक्षा चालवतात. रविवारी सकाळी दोघांची लोणी काळभोर येथील कवडीपाट टोल नाक्याजवळ बाचाबाची झाली होती.
त्यानंतर रेखले याने सागरला दारु पिण्याच्या बहाण्याने बोलवून घेऊन लाकडी बांबुने तसेच दगडाने तोंडावर मारुन खून केला.
सागर गायकवाड मृतावस्थेत सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai), पोलीस निरीक्षक गुन्हे दिगंबर शिंदे (Police Inspector Digambar Shinde)
यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रेखले याला ताब्यात घेतले आहे.
Web Title :- Pune Crime | rickshaw driver murdered in hadapsar pune
हे देखील वाचा :
Pune Crime | एटीएम मशीनवर दरोड्याचा प्रयत्न, परप्रांतीय टोळीला कोंढवा पोलिसांकडून अटक; 5 गुन्हे उघड