पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | दिवाळीत लक्ष्मी पूजनादिवशी बुधवार पेठेतील वाहनांची तोडफोड करून नागरिकांना मारहाण करणाऱ्या टोळक्याला युनीट एकने अटक केले. त्यांच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनुज जितेंद्र यादव Anuj Jitendra Yadav (19), दक्ष जुबेर गिलानी Daksh Zubair Geelani (20), राहुल उर्फ बाबा विनोद बारवासा Rahul alias Baba Vinod Barwasa (23, तिघेही रा. वडगाव शेरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
लक्ष्मी पुजनाच्या दिवशी बुधवार पेठ (Budhwar Peth, Pune) परिसरात जबरी चोरी करून मोबाईल चोरणारे आरोपी मोबाईल विक्रीसाठी राष्ट्रभुषण चौकात येणार असल्याची माहिती युनीट एकला मिळाली.
पथकाने सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.
त्यांनी गाड्यांची तोडफोड करून लोकांना मारहाण केल्याची कबुली दिली.
आरोपी पैकी राहुल उर्फ बाबा विनोद बारवासा याचे विरूध्द गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल आहे.
त्याला फरासखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals
हे देखील वाचा :
Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’
MNS Leader Sandeep Deshpande | किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप, मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले…