भोर/पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसून पोस्टमनचा (Postman) दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात पुणे-सातारा महामार्गावर (Pune-Satara Highway) केळावडे गावच्या हद्दीत एका कंपनीसमोर गुरुवारी सायंकाळी झाला. अपघातात (Pune Crime) दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नसरापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अशोक नामदेव भांडवलकर Ashok Namdev Bhandvalkar (वय-55 रा. केळावडे, ता. भोर) असे मृत्यू झालेल्या पोस्टमनचे नाव आहे. तर सिद्धार्थ राजेश देशमुख Siddharth Rajesh Deshmukh (वय-21 रा. आनंदनगर, वडगाव बुद्रुक) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिद्धार्थवर राजगड पोलीस ठाण्यात (Rajgad Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत अक्षय रमेश भांडवलकर यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक भांडवलकर हे पुणे-सातारा महामार्गावरील केळावडे गावाच्या हद्दीत
एक कंपनीसमोरील रस्ता ओलांडत होते. त्यावेळी सिद्धार्थ त्याच्या दुचाकीवरुन पुण्याकडून भरधाव वेगात आला.
त्याच्या दुचाकीची धडक अशोक भांडवलकर यांना बसली.
यामध्ये गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | postman died in bike collision at bhor pune
हे देखील वाचा :
Chandrakant Khaire | किर्तिकरांना म्हातारचळ लागलय, चंद्रकांत खैरेंचा शेलक्या शब्दात हल्लाबोल