पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पाषाण, सुस (Pashan – Sus Road) तसेच हनुमान टेकडीवर (Hanuman Tekdi Pune) फिरायला गेलेल्या युगलांना शस्त्राचा धाक दाखवून लुबाडण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. गुंडांनी आता आपला मोर्चा पर्वती टेकडीकडे (Parvati Tekdi Pune) वळविल्याचे दिसून येते. पर्वती टेकडीवर फिरायला गेलेल्या एका युगलाला (Love Birds) भर दुपारी कोयत्याचा धाक दाखवून लुबाडण्यात आले. दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police) सराईत गुंडासह (Criminal On Pune Police Record) दोघांना अटक केली आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सचिन अर्जुन भिसे Sachin Arjun Bhise (वय २५) आणि चेतन गणेश यलमेळी Chetan Ganesh Yelmali (वय २२, दोघे रा. तळजाई माता वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी खराडी येथील एका २३ वर्षाच्या तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७३/२२) दिली आहे. ही घटना पर्वती टेकडीमागे मंगळवारी दुपारी चार वाजता घडली. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि तिचा मित्र पर्वती टेकडीच्या मागे फिरायला गेले होते. एका ठिकाणी ते थांबले असताना दोघे चोरटे तेथे आले.
त्यांनी फिर्यादी यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील घड्याळ, मोबाईल, सोन्याची साखळी, रोख रक्कम
असा 58 हजार 439 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला.
त्याला त्यांच्या मित्राने विरोध केला असताना त्यांनी मित्राच्या डोक्यात कोयत्या मारुन त्याला जबर जखमी केले.
त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर तेथून ते पळून जात असताना पोलिसांनी दोघांचा पाठलाग करुन पकडले.
चेतन येलमेळी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. पोलीस उपनिरीक्षक कामठे (PSI Kamte) तपास
करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | On the Parvati tekdi hill, in the afternoon, the couple was robbed by the fear of the coyote; A friend was seriously injured by a knife in the head
हे देखील वाचा :
T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या
Bharat Jodo Yatra | भारत जोडो यात्रेचा अग्निपरीक्षेचा टप्पा उद्यापासून सुरु; प्रियंका गांधी मैदानात
CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा आणि आठवड्याभरात अंमलबजावणी