पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत जय भवानी चौकाजवळ युवकावर बेछुट गोळीबार (Firing In Pune) करणार्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या ताब्यातील 2 देशी बनावटीचे गावठी पिस्टल जप्त करण्यात आले आहे (Pistol Seized). वारजे माळवाडी पोलिसांनी अवघ्या 24 तासात तिघांना ताब्यात घेत अग्नीशस्त्रे जप्त केली आहेत. (Pune Crime News)
ताब्यात घेण्यात आलेले तिघेही अल्पवयीन आहेत. त्यांनी दि. 17 जून 2023 रोजी दुपारी जय भवानी चौकाजवळ सुरज तात्याबा लंगर (21, रा. वारजे माळवाडी) याच्यावर गोळीबार केला होता. गोळीबारामध्ये सुरज हा जखमी झाला होता. वारजे माळवाडी पोलिस गोळीबार करणार्यांचा शोध घेत होते. (Pune Crime News)
रविवारी (दि. 18 जून 2023) रोजी तपास पथकातील पोलिस अंमलदार प्रदिप शेलार (Police Pradeep Shelar) आणि पोलिस कॉन्स्टेबल बंटी मोरे (Police Bunty More) यांना सुरज याच्यावर गोळीबार करणार्यांबद्दल गोपनीय माहिती मिळाली. गोळीबार करणारे तिघे वारजे येथून लाल-काळया रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून तोंडाला रूमाल बांधून चांदणी चौकाच्या दिशेने जात असल्याचे समजल्यावर तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे (PSI Narendra Mundhe), पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे (PSI Rameshwar Parve) यांनी पोलिस नाईक प्रदिप शेलार, अमोल राऊत हणमंत मासाळ, पोलिस कॉन्स्टेबल बंटी मोरे, श्रीकांत भांगरे व विक्री खिलारी यांच्यासह वेगवेगळया टीम तयार करून चांदणी चौकाकडे जाणार्या रोडवर सापळा रचला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काही वेळाने चांदणी चौकाकडे (Chandani Chowk) तिघेजण तोंडाला रूमाल बांधून एका पल्सर मोटारसायकलवरून जात होते. पोलिसांनी त्यांना हेरले आणि शिताफिने ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी दोघांच्या कमरेला देशी बनावटीची दोन गावठी पिस्टल आढळून आल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 24 तासात गोळीबार करणार्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलिस उपायुक्त सुहेश शर्मा (IPS Suhail Sharma),
सहाय्यक पोलिस आयुक्त भिमराव टेळे (ACP Bhimrao Tele) यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे
पोलिस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे (PI Dattaram Bagwe) यांच्या सुचनेनुसार तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे,
पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलिस नाईक प्रदिप शेलार, अमोल राऊत, हणमंत मासाळ, पोलिस कॉन्स्टेबल बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, विकी खिलारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
Web Title : Pune Crime News | Warje Malwadi Police Detained Three Minor In Attempt To Murder Case Firing In Jai Bhavani Chowk Pune