कोरेगाव भीमा : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | शिरूर तालुक्यातील (Shirur Taluka) कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील भीमा नदीच्या (Bhima River) पाण्यामध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळी काही मुले पोहण्यासाठी भीमा नदीमध्ये गेली होती. त्यावेळी ही दुर्देवी घटना घडली आहे. (Pune Crime News)
अनुराग विजय मांदळे आणि गौरव गुरूलिंग स्वामी असे बुडालेल्यांची नावे आहेत. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते दोघे पाण्यात बुडाली आहे. त्यांच्यासोबत पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलांनी आरडा-ओरडा केल्याने शेजारी शेतात असलेल्या तानाजी ढेरंगे यांनी नदीकाठी धाव घेतली. त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात (PSI Avinash Thorat) यांना कळविली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस काही वेळातच भीमा नदीकाठी दाखल झाले. पोलिस अधिकारी वैभव पवार (Police Officer Vaibhav Pawar),
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिस हवालदार मंगेश लांडगे (Police Mangesh Landge) आणि पोलिस अंमलदार अमोल रासकर (Police Amol Raskar)
यांनी शोधकार्य सुरू केली. दरम्यान, पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) अग्नीशमन दलाचे अधिकारी
आणि जवान देखील घटनास्थळी दाखल झाले.
सर्वांनी पाण्यात बुडालेल्या दोघांचा युध्दपातळीवर शोध घेतला मात्र संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध लागला नाही.
Web Title : Pune Crime News | Very Sad ! 2 children drowned in Bhima river
- Maharashtra Politics News | ‘तुम्हाला पदं भाजपमुळे…’, भाजप नेत्याने उदय सामंत, दादा भुसेंना सुनावलं (व्हिडिओ)
- Pune Crime News | ‘हाफ मर्डर’च्या गुन्ह्यातील आरोपींचं लपुन बिबवेवाडी ओटा परिसरात वास्तव्य; गुन्हे शाखेने आरोपी महिलेसह आवळल्या दोघांच्या मुसक्या
- Maharashtra Politics News | मविआच्या बैठकीत शरद पवारांची मोठी खुर्ची अन् उद्धव ठाकरे…, भाजपने पुन्हा ठाकरे गटाला डिवचलं (व्हिडिओ)