पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | कुत्र्यांच्या पिल्लांचा त्रास होत असल्याने त्यांना उंदीर मारण्याचे विषारी औषध खाण्यातून देऊन मारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी अनिकेत संजय राजपूत (वय २८, रा. वारजे माळवाडी) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ८६/२३) दिली आहे. त्यानुसार वारजे माळवाडी पोलिसांनी (Warje Malwadi Police) नागेश सोनवणे (रा. सिद्धार्थ चौक, रामनगर, वारजे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रामनगरमधील सिद्धार्थनगर येथे १ मार्च रोजी घडला होता. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ चौक येथील बापू घनगांवकर यांच्या मोकळया पडीक जागेत
कुत्री फिरत असतात. त्याचा त्रास होत असल्याने नागेश सोनवणे याने या कुत्र्यांच्या पिल्लांना उंदीर मारण्याचे
विषारी औषध खाण्यातून दिले. त्यामुळे तेथील तीनही कुत्र्यांच्या पिल्लांचा मृत्यु झाला.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | The mother killed the little girl by strangulation; Murder case of 3-year-old girl in Khadki revealed
हे देखील वाचा :
V V Karmarkar Passes Away | मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर यांचे निधन