Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीच्या नाकाचे हाड केले फ्रॅक्चर; कोंढव्यातील घटना
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | चारित्र्याचा संशयावरुन झालेल्या वादावादीत पतीने पत्नीला (Husband Wife Quarrel) जोरात ठोसा मारुन तिच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कोंढव्यातील (Kondhwa News) भाग्योदयनगरमधील गल्ली नं. ३२ येथे रविवारी दुपारी तीन वाजता घडली. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी एका २७ वर्षाच्या विवाहितेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 31 वर्षीय व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे पती पत्नी आहेत.
आरोपी हा नेहमी फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेत असे.
त्यावरुन फिर्यादीशी वाद घालून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करीत असे.
रविवारी दुपारी त्याने भांडण उकरुन काढले. फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यात त्यांच्या नाकावर हाताने जोरात ठोसा मारला. तोंडावर लाथ मारली.
त्यामुळे त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असून त्या गंभीर जखमी झाल्या.
सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | fractured wife’s nose bone with suspicions of character; Incident at Kondhwa
हे देखील वाचा :
Pune Crime News | विषारी औषध दिल्याने 3 कुत्र्यांचा मृत्यु; एकाविरोधात गुन्हा दाखल
Comments are closed.