पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | खून व मोक्का सारख्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना कोंढवा पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. आरोपी शेवाळे टोळीतील असून तो दीड वर्षापासून फरार होता. ही कारवाई (Pune Crime News) हांडेवाडी चौकात करण्यात आली. आकाश शांताराम काळे (वय-24 रा. माऊली बिल्डींग, फुरसुंगी, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2021 मध्ये खुनाची घटना घडली होती. तेव्हापासून आरोपी आकाश काळे हा दीड वर्षापासून फरार होता.
कोंढवा पोलीस ठाण्यातील (Kondhwa Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशनच्या अनुषंगाने हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार गोरखनाथ चिनके, संतोष बनसुडे यांना माहिती मिळाळी की, कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आणि मोक्का कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आलेला फरार आरोपी हांडेवाडी चौकात येणार आहे. तेथून तो गावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी हांडेवाडी चौकात सापळा रचून आरोपीला अटक केली. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh), सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Pournima Taware),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे (Senior Police Inspector Santosh Sonawane), पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले (Police Inspector Sanjay Mogle)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील (PSI Swapnil Patil), निलेश देसाई,
सतिस चव्हाण, गोरखनाथ चिनके, जोतिबा पवार, सुजित मदन, बनसुडे, सागर भोसले, लक्ष्मण होळकर यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Crime News | The fugitive accused in murder and mokka crime was arrested by Kondhwa police
हे देखील वाचा :
Nashik Crime News | नाशिकमध्ये एकाच दिवशी इंजिनिअर तरुण-तरुणीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट
Police Committed Suicide in Chandrapur | चंद्रपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, पोलीस दलात खळबळ
Raigad Crime News | सासरच्या जाचाला कंटाळून 27 वर्षीय विवाहित तरुणीची आत्महत्या; रायगडमधील घटना