पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या (Pune Minor Girl Rape Case) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली असून अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार प्रामुख्याने जवळचे नातेवाईक किंवा शेजारी यांच्याकडून होत असल्याचे समोर आले आहे. लोणी काळभोर (Pune Police) परिसरातील एका अल्पवयीन मुलीला कपडे धुण्यासाठी बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 17 वर्षीय पीडित मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून सुदर्शन शेरमाळे (मुळ रा. मनमाड जि. नाशिक सध्या रा. हांडेवाडी ता. हवेली) याच्यावर आयपीसी 354, 354अ, 376, 376/2/फ/न सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी घडला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुळचा नाशिक जिल्ह्यातील असून हाडंवाडी येथे रुम भाड्याने घेऊन राहतो.
नोव्हेंबर महिन्यात आरोपीने पीडित मुलीला कपडे धुण्याच्या कामानिमित्त रुमवर बोलावून घेतले.
यानंतर त्याने पीडित मुलीला जबरदस्तीने पकडून तिच्यासोबत गैरवर्तन केले.
तसेच तीन वेगवेगळ्या दिवशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार (API Jitendra Khairnar) करीत आहेत.
- एटीएसने नारायणगावातून ८ बांगला देशी नागरिकांना पकडले
- पतीचा काटा काढण्यासाठी आधी विषप्रयोग, नंतर दिली सुपारी; पोलीस तपासात पत्नीचे कारनामे आले समोर
- विवाहित महिलेकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी, नकार दिल्याने केला खून; रावेत येथील घटना
- ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने एकाची 15 लाखांची फसवणूक, विश्रांतवाडी परिसरातील घटना
- कामावरुन काढून टाकल्याच्या कारणावरुन ऑफिसची तोडफोड, हडपसर येथील घटना
- गृहकर्ज मंजुरीच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक, मुंढवा परिसरातील प्रकार; महिलेवर गुन्हा दाखल