पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | विमाननगर परिसरातील एका हॉटेल व्यावसायिकाकडे 25 हजार रूपयांच्या खंडणीची मागणी (Extortion Cases) केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police) एकाला अटक केली आहे. साकिब सादीक शेख Saqib Sadiq Shaikh (25, रा. कर्मभुमीनगर, लोहगाव Lohegaon, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात 28 वर्षीय हॉटेल चालकाने पोलिसांकडे तक्रार दिली होती. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी साकिब सादीक शेखने दि. 13 फेब्रुवारी 2023 आणि दि. 14 एप्रिल 2023 रोजी फिर्यादीस त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल (Whatsapp Call) व मेसेज करून तुला तुझे हॉटेल व्यवस्थित चालवायचे असेल तर 25 हजार रूपये द्यावे लागतील असे म्हणुन खंडणीची मागणी केली. आरोपी साकिब शेखने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने त्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दिली. पोलिसांनी खंडणी मागणार्या साकिब शेखला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ढावरे करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Pune-Vimannagar Crime News: Hotelier demands extortion of 25 thousand, one arrested
हे देखील वाचा :
BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी