पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कात्रीने कपाळावर मारहाण केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये (Chaturshringi Police Station) एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शुभम विजय चौधरी (20) आणि त्याच्या साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सतीश लक्ष्मण सुर्यवंशी (44, रा. जनवाडी, पुणे) यांनी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सतीश सुर्यवंशी आणि शुभम चौधरी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सतीश सुर्यवंशी हे टेलरिंगच्या दुकानात काम करीत बसले होते. त्यावेळी शुभम चौधरी आणि त्याचा साथीदार तेथे आले. त्यांनी सतीश यांच्या हातून कात्री हिसकावुन घेतली. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले. वादामध्ये शुभमने सतीश यांच्या कपाळावर कात्रीने मारहाण करून त्यांना जखमी केले. तो तेथुन निघून गेला. पोलिसांनी सतीश यांच्या फिर्यादीवरून शुभम आणि त्याच्या साथीदाराविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस हवालदार मोरे करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Chatushringi Police Station – Beating on forehead with scissors for minor reason
हे देखील वाचा :