पुणे : Pune Crime News | लग्न करण्याच्या आमिषाने (Lure Of Marriage) सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी (Minor Girl Rape Case) दाखल गुन्ह्यात पीडिता व पीडितेची आई फितूर झाली. त्यामुळे आरोपीची तब्बल नऊ वर्षानंतर विशेष न्यायाधीश (पोक्सो) एस. पी. पोंक्षे (Judge S. P. Ponkshe) यांनी निर्दोष मुक्तता केली. अशी माहिती ॲड. राकेश सोनार (Adv. Rakesh Sonar) यांनी दिली.
आरोपीतर्फे ॲड. राकेश सोनार यांनी न्यायालयात बाजू मांडली. नामदेव बाळासाहेब वाघमोडे या आरोपीची भा.दं.वि. ३६३, ३६६ अ ३७६ व लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा (POCSO Act) कलम ४, ८ च्या गुन्ह्यातून फौजदारी प्रकियेच्या संहिता कलम २३५ (१) अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात आली. ही घटना १७ फेब्रुवारी २०१३ रोजी घडली होती. तेव्हा पीडिता अल्पवयीन होती. याप्रकरणी १७ फेब्रुवारी २०१३ रोजी फिर्यादीच्या आईने फिर्याद दिली होती.
१८ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपी आणि पीडिता फिर्यादीच्या घरी आला. लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीला फूस लावून पळवून नेले म्हणून फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी पक्षाने दोन साक्षीदार तपासले. पिडीतेने आरोपीला ओळखत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. आईसोबत भांडणे झाली होती म्हणून रागाच्या भरात मावशीकडे निघून गेल्याची साक्ष तिने दिली. यामुळे आरोपीवरचा गुन्हा सिद्ध करता आला नाही.
अँड. राकेश सोनार यांनी युक्तिवाद करताना हे सिद्ध करून दिले की सदरच्या प्रकरणात सदरची फिर्यादी व आरोपी यांच्यात पूर्वीपासून गावातील किरकोळ जमिनीवरून वाद होता त्या वादाचा संदर्भ घेऊन सदर आरोपी वर सदरची खोटा गुन्हा दाखल केला व तसेच पोस्को कायदा अंतर्गत , व सदरची पुरावे आरोपी विरुद्ध खोटा दाखल केलेले पाहिले असता सदर आरोपी विरुद्ध एक ही पुरावा संशयाच्या पलीकडे जाऊन सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, व आरोपी विरुद्ध कोणतीच प्रकारचे पोस्को अंतर्गत पुरावे सरकार पक्षाने न्यायालयासमोर सिद्ध केले नाही सदरचा युक्तिवाद गृहीत धरून न्यायालयाने सदर आरोपीस निर्दोष मुक्त केले आहे.
या प्रकरणात ॲड. राकेश सोनार यांना ॲड. उमंग यादव (Adv. Umang Yadav,), प्रज्वल पवार, ऋत्विक जाधव, कुमार खराडे, शाक्या सुवी, प्रतिक जवळकर, ॲड. विनय साबळे (Adv. Vinay Sable), ॲड. प्रणव जोशी (Adv. Pranav Joshi), ॲड. अविनाश खुडे (Adv. Pranav Joshi) यांनी सहकार्य केले.