Pune Crime News | अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेकडून अटक, 10 लाखांचे मेफेड्रोन जप्त

Arrest

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti Narcotics Cell Pune) Pune ANC अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 10 लाख रुपये किंमतीचे मेफेड्रोन (Mephedrone (MD) जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई (Pune Crime News) पुणे रेल्वे स्टेशन येथे करण्यात आली.

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

सोहेल युनूस खोपटकर Sohail Yunus Khopatkar (रा. मुबंई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) एनडीपीएस कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेकडील अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे पथक बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या (Bundgarden Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस नाईक सय्यद साहिल शेख (Syed Sahil Shaikh) व पोलीस कॉन्स्टेबल अझीम शेख (Azim Shaikh) यांना बातमी मिळाली की, सोहेल युनूस खोपटकर हा व्यक्ती काहीतरी अंमली पदार्थ विक्री करिता पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) येथे येणार आहे. कायदेशीर सोपस्कार पार पाडून पथकाने छापा कारवाई करून सोहेल याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 10 लाख 30 हजार 600 रुपये किंमतीचे 51 ग्रॅम 430 मिली ग्रॅम एम.डी हा अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त करुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सुनील थोपटे (PI Sunil Thopte), पोलीस उपनिरीक्षक एस.डी. नरके (PSI S.D. Narake) पोलीस अंमलदार सय्यद साहिल शेख, अझीम शेख, घुले, देशपांडे, जाधव, गायकवाड,शेळके, साळूंखे यांच्या पथकाने केली.