पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | लोखंडी हत्याराचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून 28 हजार 870 रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटली. ही घटना शनिवारी (दि.11) रात्री सव्वा अकराच्या सुमारास लोहगाव-वाघोली रोडवरील एच.पी. पेट्रोल पंप (HP Petrol Pump Lohgaon-Wagholi Road) येथे घडली आहे. याप्रकरणी चार अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत राहुल भिमराव पिंगळे (वय- 24 रा. दादाची वस्ती, लोहगाव-वाघोली रोड, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी चोरट्यांविरुद्ध आयपीसी 392, 427, 452, 34 आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लोहगाव-वाघोली रोडवरील एच.पी. पेट्रोल पंपावर कामाला आहेत. शनिवारी रात्री फिर्यादी व त्यांचे सहकारी पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये बसले होते. रात्री सव्वा अकराच्या सुमारास चार अनोळखी चोरटे तोंडाला कपडा बांधून जबरदस्तीने ऑफिसमध्ये घुसले.
त्यांनी फिर्यादी यांना लोखंडी हत्याराचा धाक दाखवून जबरदस्तीने 28 हजार 870 रुपयांची रोकड घेतली.
तसेच फिर्यादी यांच्या सहकाऱ्याचा मोबाईलचे नुकसान करुन रोकड चोरून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पोटे (API Pote) करीत आहेत.
- Pune Crime News | उधारीवर माल देणे पडले महागात, 48 लाखांची फसवणूक; मार्केटयार्ड परिसरातील घटना
- Imbalance Mental Health | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!
- Low Blood Pressure | Mental Health बिघडल्यास दिसतात ‘हे’ संकेत, त्यांचाकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात..!
- Benefits Of Fruits | ‘या’ 5 फळांचा समावेश करा रोजच्या आहारात, होतील अनेक फायदे…
- Winter Food For Diabetic Patients | हिवाळ्यात डायबिटीजच्या रुग्णांनी खा ‘हे’ पदार्थ, ब्लड शुगर राहिल नियंत्रणात..
- Skin Care – Pimples Problem | आजपासून ‘या’ गोष्टी खाणे करा बंद, तुमच्या चेहऱ्यावर कधीच येणार नाही मुरुम आणि वांग…