पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मामीचे नाते असलेल्या आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या महिलेला तिच्या पतीला, मुलाला ठार मारण्याची धमकी (Threat to kill) देऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. इतकेच नाही तर त्यांचे लग्न झाले असतानाही मंदिरात नेऊन त्यांच्याशी जबरदस्तीने लग्न करुन गळ्यात मंगळसुत्र घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याबाबत कोथरुड पोलिसांनी किरण दत्तात्रय मारणे Kiran Dattatraya Marne (वय २५, रा. शिवकल्याणनगर, सुतारदरा, कोथरुड – Sutardara, Kothrud) याच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२०/२३) दिली आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी, सातारा, कोल्हापूर, जांभुळवाडी येथे फेब्रुवारी ते २३ मे २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा नातेवाईक आरोपीने त्यांच्याबरोबर सेल्फी काढत. मार्च २०२३ मध्ये आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्यांचे पती, मुलगा व इतर नातेवाईकांना जीव ठार मारण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर ११ मे रोजी फिर्यादींना आपल्या केळेवाडीतील रुमवर बोलावून तेथे त्यांना पुन्हा धमकी देऊन त्यांना सातारा, कोल्हापूर, येथे घेऊन गेला. तेथे लॉजवर त्यांच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध केले. त्यानंतर फिर्यादी यांना जाभुंळवाडी येथे घेऊन जाऊन तेथील मंदिरात फिर्यादीच्या गळ्यात जबरदस्तीने मंगळसुत्र घालून लग्न केले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक आडगळे तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune Crime News | Kothrud Police Station – Woman assaulted by threatening
to kill husband, child; Married in the temple
- पुणे क्राईम न्यूज : भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन – सराईत गुंडाच्या टोळक्याने दारू
दुकानावर घातला दरोडा; दारुच्या बाटल्यासह नुकसान करुन गल्ल्यातील रोकड चोरली - Har Ghar Savarkar | ‘हर घर सावरकर’ समिती तर्फे 27 मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त
विशेष कार्यक्रमाचे आयोजन; ‘मोपल्यांचे बंड ते केरला स्टोरी’ हा विशेष कार्यक्रम - Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील
मुलांची क्रिकेट स्पर्धा; क्रिकेट नेक्स्ट अॅकॅडमी संघाला विजेतेपद !!