पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | टीव्ही केबल (TV Cable) ओढण्याचे काम करीत असताना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमधून ( High Pressure Power Lines) करंट लागल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास कोथरूड (Kothrud) परिसरातील सुतारदरामध्ये (Sutardara) लेन नंबर 4 जवळील साई निवास या घराच्या टेरेसवर घडली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुंडलिक लक्ष्मण शिंदे (33, रा. सुतारदरा, कोथरूड) असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे तर पप्पू उर्फ स्वप्नील शिवराम बोडके (28, रा. गल्ल नं. 23, गणराज मित्र मंडळ, सुतारदरा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. (Pune Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, पुंडलिक शिंदे आणि पप्पू उर्फ स्वप्नील बोडके हे दोघे टीव्ही केबल ओढण्याचे काम केबल ऑपरेटर नितीन पवार (रा. पौड फाटा) यांच्याकडे करत होते. गुरूवारी सकाळी ते दोघे सुतारदरा येथील एका घराच्या टेरेसवर टीव्ही केबल ओढण्याचे काम करीत असताना त्यांना उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा करंट लागला. त्यामुळे शिंदे याचा मृत्यू झाला तर बोकडे हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात (Kothrud Police Station) अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title :- Pune Crime News | Kothrud Police Station: One killed, another critically injured due to
electrocution from high voltage power line
हे देखील वाचा :
Bhor Lok Nyayalaya | भोर येथे 11 मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन