पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | संक्रातीच्या दिवशी तरूणावर खुनी हल्ला केल्याच्या प्रकरणात खडक पोलिसांनी 4 आरोपींना अवघ्या 24 तासाच्या आत अटक केली आहे. त्यांच्याविरूध्द खडक पोलिस ठाण्यात (Khadak Police Station) खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनिकेत व्यंकटेश कोळी (21), शैलेश उर्फ साहील रामप्पा बॅगरी (21) अजय रामप्पा बॅगरी (20) आणि भरत व्यंकटेश कोळी (19) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की संक्रातीच्या दिवशी एका तरूणाने त्याची पार्क केलेली मोटारसायकल पाडल्यावरून भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी आपआपसात संगणमत करून तरूणावर खुनी हल्ला केला. (Pune Crime News)
गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने खडक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव
(Sr PI Sangita Yadhav) यांनी तात्काळ आरोपींना अटक करण्याबाबत सुचना दिल्या.
त्यानुसार पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे (PI Rajesh Tatkare) यांनी तात्काळ दोन तपास पथके
तयार केली. आरोपींबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिस उपायुक्त संदिपसिंह गिल (Sandeep Singh Gill), सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर
(ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संगीता यादव,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे, सहाय्यक निरीक्षक राकेश जाधव (API Rakesh Jadhav),
उपनिरीक्षक अतुल बनकर (PSI Atul Bankar), पोलिस अंमलदार अजीज बेग, संदीप तळेकर, विशाल जाधव, सागर घाडगे, लखन ढावरे, मंगेश गायकवाड, रफिक नदाफ, अक्षयकुमार वाबळे, नितीन जाधव, महेश पवार, महेश जाधव आणि योगेश चंदेल यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. गुन्हयाचा पुढील तपास खडक पोलिस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Khadak police arrested those who attacked the youth within 24 hours
हे देखील वाचा :
MP Sanjay Raut | ‘यापुढे आम्ही आमच्या भूमीका ठरवू’, संजय राऊतांचा मित्रपक्षांना सूचक इशारा