पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | प्रेमाचा बहाणा करुन अल्पवयीन असताना तिच्याबरोबर शरीरसंबंध (Physical Relationship) निर्माण केले. त्याचे फोटो व व्हिडिओ बनवून तिला सातत्याने ब्लॅकमेक (BlackMail) करुन बलात्कार (Rape In Pune) केला. सोलापूरला नेऊन च्यिाबरोबर मंदिरात लग्न केले. ही तरुणी बहाणा करुन वडिलांच्या घरी आल्यावर नांदण्यासाठी परत आली नाही तर फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) नागेश राजू चव्हाण Nagesh Raju Chavan (वय २३, रा. सच्चाईमाता नगर, आंबेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका १९ वर्षाच्या तरुणीने फिर्याद (गु. रजि. नं. १६६/२३) दिली आहे. हा प्रकार १४ फेब्रुवारी २०२१ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान फिर्यादी अल्पवयीन असताना घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी नागेश चव्हाण यांनी ओळख करुन प्रेम असल्याचे भासविले. तिला शितल लॉज येथे घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले.
त्याचे फोटो व व्हिडिओ काढले. त्यावरुन तिला ब्लॅकमेल करुन वारंवार बलात्कार केला.
२ फेब्रुवारी रोजी तो फिर्यादीला कॉलेजच्या बाहेर भेटायला आला व लग्न करण्याबाबत बोलू लागला.
तेव्हा तिने नकार दिला. त्यावर त्याने फिनेल पिण्याचे नाटक केले. फिर्यादीला घेऊन तो सोलापूरला आला.
तेथे ३ फेब्रुवारी रोजी त्याने रुपा भवानी मंदिर येथे लग्न केले.
त्यानंतर फिर्यादी बहाणा करुन त्याच्या तावडीतून निसटल्या व वडिलांच्या घरी परत आल्या.
त्यानंतर तिने नांदण्यासाठी यावे, असे तो म्हणू लागला.
तिने नकार दिल्यावर नांदण्यासाठी परत आली नाही तर फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यामुळे या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक ढमे
तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Pune Crime News | Forced marriage by rape and blackmail; Threatening to make the video viral to come to house
हे देखील वाचा :