पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. घोरपडी पेठ, सिंहगड रोड याठीकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यातच मंगळवारी (दि.7) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या (Pune Police) हद्दीत एका कोरियन नागरिकावर गोळीबार (Firing In Pune) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना सकाळी सहा ते साडे सहाच्या सुमारास औंध परिसरातील ऍलोमा काऊंती या आलिशान सोसायटीच्या परिसरात घडली आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
औंध परिसरातील ऍलोमा काऊंती या सोसायटीच्या परिसरामध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुखावर एका अज्ञात व्यक्तीने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी त्या व्यक्तीला लागली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील (Chaturshringi Police Station) पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. (Pune Crime News)
घटनास्थळावर पोलिसांना एक रिकामी पुंगळी सापडली आहे. त्यानंतर तात्काळ न्यायवैधक प्रयोगशाळेच्या
बॅलेस्टिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन
ही गोळी नेमकी कोणत्या बंदुकीमधून झाडण्यात आली याचा अंदाज घेतला. गोळीबार झालेली व्यक्ती ही दास या
बड्या कंपनीची रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाची प्रमुख आहे. गुन्ह्याचा पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे (IPS Balaji Pandhare) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.
- वानवडी आणि विश्रामबाग पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
- वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवणाऱ्या विनोद सोमवंशी व त्याच्या 12 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 79 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA
- पुणे कॅम्पातील जागा बळकावण्याचा प्रयत्न, 11 जणांवर FIR
- 55 वर्षाच्या व्यक्तीकडून 10 वर्षाच्या मुलीचा विनयभंग, सिंहगड रोड परिसरातील घटना
- पुण्यातील धक्कादायक घटना! तू इथे का थांबलास? असं म्हणत तरुणाच्या छातीत चाकू भोसकून खून