Pune Crime News | पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटेंनी घेतली जबरी चोर्‍या करणार्‍या आरोपींची ओळख परेड, 65 सराईतांच्या माहितीचे आदान प्रदान

Pune Crime News | Deputy Commissioner of Police Shashikant Borat conducted an identification parade of accused burglars, shared information of 65 innkeepers.

पुणे : बहुजननामा ऑनलाइन –  Pune Crime News | पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील झोन-4 मधील येरवडा, विमानतळ, चंदनगर, लोणीकंद, विश्रांतवाडी, खडकी व चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील जबरी चोरी करणार्‍या (Robbery In Pune) आरोपींची पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांनी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये (Yerwada Police Station) ओळख परेड घेतली. त्यामध्ये प्रत्येक आरोपीची गुन्हा करण्याची पध्दत तसेच त्याच्या गुन्हेगारी अभिलेखाचे आदान-प्रदान करण्यात आले. झोन-4 मधील 65 सराईत गुन्हेगारांच्या माहितीची आदान-प्रदान करण्यात आले. (Pune Crime News)

 

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अप्पर पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्या मार्गदर्शनाखाली झोन-4 मध्ये होणार्‍या जबरी चोरीच्या घटनांना आळा बसवा म्हणून गुरूवारी येरवडा पोलिस ठाण्यात सराईतांची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Sr PI Balkrishna Kadam), लोणीकंद पोलिस स्टेशनचे (Lonikand Police Station) सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन जाधव (API Gajanan Jadhav), विमानतळ पोलिस स्टेशनचे (Viman Nagar Police Station) सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय चंदन (API Vijay Chandan),

येरवडा पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे (PSI Ankush Dombale), पोलिस उपनिरीक्षक रविंद्रकुमार वारंगुळे (PSI Ravindrakumar Warangule), विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमधील (Vishrantwadi Police Station) पोलिस उपनिरीक्षक लहु सातपुते (PSI Lahu Satpute), चतुश्रृंगी पोलिस स्टेशनमधील (Chaturshringi Police Station) पोलिस उपनिरीक्षक रूपेश चाळके (PSI Rupesh Chalke), खडकी पोलिस स्टेशनमधील (Khadki Police Station) पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदुम (PSI Vaibhav Magdum) आणि चंदननगर पोलिस स्टेशनमधील (Chandan Nagar Police Station) पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे (PSI Dilip Palve) यांच्यासह सर्व पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी हजर होते. (Pune Crime News)

जबरी चोरीच्या गुन्हयांना आळा बसावा या उद्देशाने अशा प्रकारचे कार्यक्रम आगामी काळात देखील सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Web Title : Pune Crime News | Deputy Commissioner of Police Shashikant Borat conducted an identification parade of accused burglars, shared information of 65 innkeepers.