पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | तू भाई झालास का, तू मला मारतोस का, तुला आज खल्लास करुन टाकतो, असे म्हणून चौघांनी तरुणावर कोयत्याने (Koyta) वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मनोज तुकाराम सूर्यवंशी (वय २०, रा. धायरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) सौरभ ऊर्फ दादा मोघे Saurabh alias Dada Moghe (वय १८), श्रावण रमेश हिरवे Shravan Ramesh Hirve (वय १९, रा. गोसावी वस्ती, सिंहगड रोड), साहिल प्रकाश चिकणे Sahil Prakash Chikkan (वय १९, रा. नांदेड फाटा), खंडु ऊर्फ बंटी रामभाऊ कांबळे Khandu alias Bunty Rambhau Kamble (वय १९) यांना अटक केली आहे. हा प्रकार धायरी येथील सिद्धार्थ कॉम्प्लेक्ससमोर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता घडला. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र रोहित पवार यांची सौरभ मोघे याच्याबरोबर गुरुवारी
वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी याच्या डोक्यावर, कमरेवर, पाठीवर व हातावर कोयत्याने
वार करुन त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक निकम (Assistant Police Inspector Nikam) तपास करीत आहेत.
Web Title : pune crime news attempted murder by stabbing a young man with an animosity incident in dhairi phata four arrested