Pune Crime News | 10 टक्के व्याजाने पैसे परत केल्यानंतरही धमकाविणार्‍या गुंडावर कारवाई

Pune Crime News | Action taken against bully who threatens even after returning money with 10 percent interest

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | व्यवसायासाठी १० टक्के व्याजाने ८ लाखांवर त्यांनी १४ लाख ७० हजार रुपये परत केले. तरीही अजून ११ लाख रुपयांची मागणी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) आनंद परशुराम धोत्रे (वय ३४, रा. शिवणे)याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोपरे गावातील एका ४१ वर्षाच्या नागरिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १८/२३) दिली आहे. हा प्रकार २७ डिसेबर २०१९ पासून सुरु होता. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आनंद धोत्रे याच्याकडून १० टक्के व्याजाने ८ लाख रुपये
घेतले होते. त्या मोबदल्यात धायरी येथील फिर्यादीचे २ फ्लॅटची नोटराजईज विसार पावती करुन दिली होती. या बदल्यात फिर्यादी यांनी रोख व ऑनलाईन स्वरुपात आरोपीला १४ लाख ७० हजार रुपये परत दिले आहेत. असे असताना आरोपी वारंवार फोन करुन अजून ११ लाख रुपयांची मागणी करीत आहे. ते न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :-  Pune Crime News | Action taken against bully who threatens even after returning money with 10 percent interest

 

हे देखील वाचा :

Disha Patani | ‘त्या’ ड्रेसमुळे अभिनेत्री दिशा पटानीला करावा लागला ट्रोलिंगचा सामना; व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News | खराडी व चंदननगर परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 17 जणांवर कारवाई

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणारा गुन्हे शाखेकडून गजाआड

Sidharth Malhotra – Alia Bhatt | आलिया भट्टने दिल्या एक्स बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राला लग्नाच्या शुभेच्छा; त्यावर सिद्धार्थने दिली ‘ही’ प्रतिक्रिया