पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | पुण्यातील पर्यटन सथळापैकी पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सारसबागेत (Sarasbaug) मंगळवारी दुपारी बेवारस बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेबाबत सारसबागेतील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना (Pune Police) माहिती दिली. घटनेची माहिती (Pune Crime News) मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (Bomb Detection and Disposal Squad (BDDS) तात्काळ घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी बेवारस बॅगेपासून नागरिकांना सुरक्षित अंतरावर बाजूला केले. त्यानंतर पथकाने बॅगेची तपासणी केली. पथकाने बॅग उघडली असता त्यामध्ये लॅपटॉप, जेवणाचा डबा आणि काही पुस्तके आढळली. एका महाविद्यालयातील तरुणांचा गट बागेत फिरण्यासाठी आला होता. त्यांच्यापैकी कोणाची ही बॅग आहे का याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान, नागरिकांनी बॉम्ब किंवा त्यासंबंधीची अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुण्यात सध्या जी-20 परिषद (G-20 Conference) सुरु आहे.
या परिषदेला विविध देशांचे प्रतिनिधी पुण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर पुणे पोलीस सतर्कतेने काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Web Title :- Pune Crime News | Abandoned bag found in Saras Bagh in Pune, huge excitement in the area
हे देखील वाचा :
Palak Tiwari | पलक तिवारीच्या नव्या फोटोने वाढवले सोशल मीडियाचे तापमान