पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार मोहसिन खान उर्फ शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई (Pune Crime News) करण्यात आली आहे. आरोपीने येरवडा आणि विमानतळ परिसरात दहशत माजवली होती. पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) केलेली ही सहावी कारवाई आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मोहसिन अन्वर खान उर्फ शेख Mohsin Anwar Khan alias Sheikh (वय-32 रा. जिजामाता नगर, नवी खडकी, पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह येरवडा आणि विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Viman Nagar Police Station) हद्दीत कोयता, तलवार, कुऱ्हाड या सारख्या हत्यारांसह फिरताना खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), विनयभंग, जबरी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अशा कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यस्थेस बाधा निर्माण झाली होती. (Pune Crime News)
आरोपीवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम (Senior Police Inspector Balkrishna Kadam) व
पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे (Police Inspector Crime Uttam Chakre) यांनी वरिष्ठांच्या मार्फत पोलीस आयुक्तांना दिला होता. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपीला एमपीडीए कायद्यान्वये नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम व पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम चक्रे, पी.सी.बी. गुन्हे
शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (P.C.B. Crime Branch Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | A staunch criminal who terrorized Yerawada and Vimannagar areas lodged in Nashik Jail; 6th Action of CP Ritesh Kumar under MPDA Act
हे देखील वाचा :
Pune Pimpri Chinchwad Crime | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, भोसरी मधील घटना