पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम करण्याची व ऑडिशन (Series Auditions) देण्यासाठी विविध कारणे सांगून एका तरुणीला सायबर चोरट्यांनी (Pune Cyber Crime) तब्बल ७१ हजार रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी एका २० वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६१४/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तरुण चंद्रशेखर शर्मा (रा. चंदीगड), आशासिंग, क्रिशन चांद (रा. पंजाब) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही एका वसतीगृहात राहते. तिने फेसबुकवर हिंदी मालिका व
चित्रपटात काम करण्यासंबंधीची जाहिरात पाहिली. त्यावर ऑडिशनसाठी संपर्क साधण्यास सांगितले होते.
त्यानुसार, तिने संपर्क साधला असता तिला वेगवेगळी कारणे सांगून ७१ हजार ८४९ रुपये जमा करण्यास सांगितले.
त्यानंतरही कोणतीही ऑडिशन घेतली नाही. त्याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
तेव्हा आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे या तरुणीच्या लक्षात आले.
पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | 71,000 fraud of a young woman in the name of audition to work in Hindi serials; cheating
हे देखील वाचा :