पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | सब कॉन्ट्रॅक्टर म्हणुन काम देण्यासाठी 63 लाख 40 हजार 41 रूपये घेवुन त्यापैकी 16 लाख रूपये परत करून 47 लाख 40 हजार 41 रूपये परत न देता फसवणूक (Cheating Case) केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात (Koregaon Park Police Station) दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रतित अशित शाह (Pratith Ashit Shah) आणि क्रितीका अशित शाह Kritika Ashit Shah (रा. सर्व्हे नं. 5/1 अ, बाणेर-पाषाण लिंक रोड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात राजु बबन काकड (45, रा. सी 13, प्रभा आनंद संकुल, धोंगडे मळा, नाशिक रोड, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा ऑक्टोबर 2021 ते दि. 21 डिसेंबर 2021 दरम्यान मिलीयन्स स्टार बिल्डींग (रूबी हॉस्पीटल शेजारी, ढोले-पाटील रोड, पुणे) येथे घटना आहे. सदरील गुन्हा नाशिक उपनगर पोलिस ठाण्यातून (Nashik Upnagar Police Station) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, टेराफर्मा सुपरस्ट्रक्ट एलएलपी कंपनीचे भागीदार प्रतित शाह आणि क्रितीका शाह यांना टाटा कंपनीचे 55 कोटी 58 लाख 47 हजार 451 रूपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे असे खोटे सांगण्यात आले. (Pune Crime News)
बनावट कागदपत्र दाखवुन त्यांनी फिर्यादी काकड यांचा विश्वास संपादन केला.
त्यांना सब कॉन्ट्रॅक्टर म्हणुन काम देण्यासाठी शाह यांनी त्यांच्याकडून 63 लाख 40 हजार 41 रूपये घेतले.
त्यापैकी 16 लाख रूपये त्यांनी परत केले. मात्र, राहिलेले 47 लाख 40 हजार 41 रूपये परत न करता त्यांचा विश्वासघात करून त्यांची फसवणूक केली. गुन्हयाचा पुढील तपास कोरेगाव पार्क पोलिस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | 47 lakhs fraud case against two; FIR at Koregaon Park Police Station
हे देखील वाचा :
Beed Crime News | खरेदीहून येताना झालेल्या अपघातात पोलिस हवालदार महिलेचा दुर्देवी मृत्यू
Kiara Advani | कियारा अडवाणीने सुशांत सिंह राजपूतच्या ‘त्या’ सवयीबद्दल केला मोठा खुलासा