पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | मंचर जवळील एकलहरे गावच्या हद्दीतील घोडनदीच्या काठावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 सख्या बहिणींचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी घडली आहे (Two Girls Death By Drowning). प्रिती शाम खंडागळे (17) आणि आरती शाम खंडागळे (18, रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे खंडागळे कुटूंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. (Pune Crime News)
बर्थडे निमित्त आरती आणि प्रिती मुंबईहून एकलहरे गावी आल्या होत्या. बुधवारी रात्री बर्थडेचा प्रोग्राम झाला. सकाळी कपडे धुण्यासाठी 5 जणी घोडनदीच्या काठावर गेल्या होत्या. नवीन पुलाजवळ त्या कपडे धुत होत्या. 5 जणींपैकी एकीचा पाय घसरला आणि ती नदीच्या पाण्यात पडली. ती बुडत असल्याचे पाहिल्यानंतर आरती आणि प्रिती या दोघी तिला वाचवण्यासाठी पाण्यात गेल्या. खोल पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या दोघी पाण्यात बुडाल्या. मात्र, पाय घसरून पाण्यात पडलेली 12 वर्षाची मुलगी वाचली आहे. आरती आणि प्रितीला वाचविण्यासाठी बाकी मुली पाण्यात उतरल्या पण त्यांच्या नाका-तोंडात पाणी जात असल्याने त्या परतल्या. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काठावरील महिलांनी आरडा-ओरडा सुरू केला. काहीजणांनी तात्काळ नदीकाठी धाव घेतली आणि पाण्यात बुडालेल्या दोघींना बाहेर काढले.
त्यांना तात्काळ मंचर येथील उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी दोघींचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
Web Title : Pune Crime News | 2 girls drowned in Ghod river in Machanar Mumbai
- Pune Police On Traffic Jam | मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक संपन्न
- Adv Krupal Paluskar | केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी पुण्यातील ॲड. कृपाल पलूसकर यांची निवड
- Surraj Gurukul | कलाकारांसाठी ‘नेतृत्व गुण आणि टीमवर्क’ कार्यशाळा संपन्न
- Chandrashekhar Bawankule | ‘मी भाजपची, पण पक्ष थोडीच माझा आहे’, पंकजा मुंडेच्या विधानावर बावनकुळे म्हणाले- ‘पंकजाताई भाजप…’
- Maharashtra Politics News | ‘नाहीतर राजकारणातून संन्यास घ्या’, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाचा खोचक सल्ला
- Jayant Patil | ‘शिंदे गटात गेलेले तात्पुरते, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत…’, जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी