पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | तडीपार गुन्हेगाराच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुण खून (Murder In Kondhwa Pune) करण्यात आला आहे. सुमित ऊर्फ काकासाहेब जाधव (रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. सुमित जाधव याला गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, लोकांना दमदाटी करणे, लुटमार करणे अशा प्रकारचे ८ गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्या प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिल्याने त्याला तडीपार करुन अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे सोडण्यात आले होते. तडीपार असला तरी तो पुण्यातच वास्तव्य करुन रहात असल्याचे स्पष्ट झाले. (Pune Crime)
याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil) यांनी सांगितले की, मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सुमित जाधव हा अशोका म्युज सोसायटीजवळून (Ashoka Mews Kondhwa) जात असताना तिघा जणांनी त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. पोलिसांनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. तिघा जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title :- Pune Crime | Murder Of Criminal Who Is On Pune Police Record Near Ashoka Mews Kondhwa
हे देखील वाचा :