पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | घरावर करणी केल्याच्या संशयावरुन दीराने भावजयीचा चाकूने गळा कापून खून (Murder in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार वडगाव शेरीमध्ये (Vadgaon Sherry Pune) घडला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
लक्ष्मीबाई श्रीराम Lakshmibai Shriram (वय ५४, रा. विडी कामगार वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी (Pune Police) श्रीनिवास जगन्नाथ श्रीराम Srinivasa Jagannath Sriram (वय ५९, रा. साईधाम सोसायटी, आव्हाळवाडी) याला अटक केली आहे.
याप्रकरणी सागर रमेश दासा Sagar Ramesh Dasa (वय ३९, रा. साफल्य बिल्डिंग, मारुतीनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४०२/२२) दिली आहे. ही घटना मारुतीनगरमध्ये शुक्रवारी दुपारी दीड वाजता घडली. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई आणि श्रीनिवास यांच्यात वाद होते. सागर श्रीनिवास याचा मित्र आहे. सागर याच्या घरी धार्मिक कार्यक्रम होता. त्याने लक्ष्मीबाई यांना घरी बोलावले होते. सागर आणि त्यांची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी श्रीनिवास तेथे आला. आपल्या घरावर लक्ष्मीबाई हिने करणी केली आहे,
या संशयावरुन व आईस भेटु देत नाही, या कारणावरुन श्रीनिवास याने आपल्याजवळील चाकूने तिचा गळा कापून
व पोटात खूपसून तिला जखमी करुन पळून गेला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सागर व त्यांची पत्नी घरी आले. तेव्हा लक्ष्मीबाई गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांनी पाहिले.
त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लक्ष्मीबाई हिला रुग्णालयात नेले परंतु,
तोपर्यंत तिचा मृत्यु झाला होता. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन श्रीनिवास याला अटक केली असून
सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर (Assistant Police Inspector Khandekar) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Murder of brother-in-law due to suspicion of cheating, incident in Vadgaon Sheri
हे देखील वाचा :