पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सासरच्या व्यक्तींकडून सातत्याने होणार्या मानसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून विवाहीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना येरवडा (Yerwada) भागात घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी महिलेच्या पतीसह सासू, सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पतीला अटक (Pune Crime) केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
स्वप्निल रमेशचंद्र बाफना Swapnil Rameshchandra Bafna (३४ रा. रामवाडी गावठाण, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत महिलेचे वडील संजय संचेती (५८, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. मे २०१३ मध्ये फिर्यादी यांची मुलगी रेणू हिचे स्वप्निल बाफना याच्याशी लग्न झाले होते. तेव्हापासून ते रामवाडी गावठाण परिसरात एकत्र राहत होते. परंतु मागील काही दिवसांपासून महिलेची सासू- सासरे तिला मानसिक त्रास देत होते. माहेरी निघून जा असे सांगत सासूने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. सततच्या जाचाला कंटाळून तिने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिनी डोंगरे (Woman Police Sub Inspector Mohini Dongre) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Married woman commits suicide due to in laws harassment Incident in Yerawada area husband Swapnil Bafna arrested
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 204 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास