पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेऊन आत्महत्या (Married Woman Suicide Case) केली. हा प्रकार कात्रज येथील सावंत कॉर्नरमधील बी विंगमध्ये सोमवारी पहाटे घडला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पल्लवी वसंत नाईक (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील राजेंद्र रामचंद्र ढोणे (वय ५५, रा. चिंचवड) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती वसंत अरुण नाईक (वय ४१) आणि सासू नर्मदा नाईक (वय ६५, रा. सावंत कॉर्नर, कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी व वसंत नाईक यांचा जानेवारी २०१० मध्ये विवाह झाला होता.
लग्नानंतर घरगुती कारणावरुन तसेच तिच्यावर संशय घेऊन पती वसंत व सासू तिचा मानसिक व शारीरीक छळ करीत होते.
या छळाला कंटाळून शेवटी तिने सोमवारी पहाटे इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
पोलीस उपनिरीक्षक ढमे अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Fed up with harassment a married woman jumps off a terrace and commits suicide Incidents in Katraj area
हे देखील वाचा :
Pune Crime | चिंचवड येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, सासूवर सत्तुरने वार