पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | माजी नगरसेवक दीपक मिसाळ (Deepak Misal) यांच्या मोबाईलवर मेसेज करुन खंडणी (Ransom) मागणार्याने एका तरुणीचा बायोडाटावरुन फोटो मार्फ करुन तिचे अश्लिल फोटो (Obscene Photo) बनवून ते व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
इम्रान समीर शेख Imran Sameer Sheikh (वय ३७, रा. घोरपडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी खराडीतील एका २३ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३५२/२२) दिली आहे. हा प्रकार २३ सप्टेबर २०२२ ला घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान शेख याने पुणे मॅरेज ग्रुपवरुन (Pune Marriage Group) फिर्यादी यांचा बायोडाटा (Biodata) घेतला. फिर्यादीचे अश्लिल फोटो व मेसेज फिर्यादीचा भाऊ व चुलत भाऊ यांचे मोबाईलवर व नातेवाईकांना व्हॉटसअॅपवर (WhatsApp Message) पाठविले. फेसबुक अकाऊंट (Facebook Account) तयार करुन त्यावर फोटो व्हायरल करणार आहे. तसेच मॅरेज सर्टिफिकेट निकालनामा व्हायरल करणार आहे. मी तुला उचलून नेणार आहे, असे धमकीचे मेसेज व्हाटसअॅपवर केले आहेत. त्यामुळे या तरुणीने बदनामी केल्याची तक्रार पोलिसांकडे (Pune Police) केली असून पोलीस निरीक्षक कदम (Police Inspector Kadam) अधिक तपास करीत आहेत. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ
(MLA Madhuri Misal) यांचा जनसंर्पकासाठी असलेल्या संपर्क क्रमांक याच्यावर आरोपीने मेसेज केले.
त्याने कधी २ लाख कधी ३ लाख तर कधी ५ लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले.
सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले.
त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी (Threat) दिली.
त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता.
त्यानंतर पोलिसांनी भा. द. वि. ३८६ आणि आय टी अॅक्ट कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला आहे.
बिबवेवाडी पोलिसांनी (Bibwewadi Police) इम्रान शेख याला अटक (Arrest) केली आहे.
सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर या तरुणीने पुढे येऊन आता तक्रार दिली आहे.
Web Title :- Pune Crime | Ex-corporator Deepak Misal was defamed by the extortionist who threatened him by spreading obscene photos of the girl.
हे देखील वाचा :