पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | नदी किनारी विहीर खोदण्यासाठी दगडामध्ये तुरुंग लावून त्यांचा स्फोट (Explosion) घडवून आणल्याने त्याचे दगड उडून आजू बाजूच्या घरांचे पत्रे, पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्या फुटून (Pune Crime) नुकसान झाले. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन अजय रालु दासारी (Ajay Ralu Dasari) याला अटक (Arrest) केली आहे.
याप्रकरणी प्रविण भागवत नाईकनवरे Pravin Bhagwat Naikanvare (वय 35, रा़ राघोबा पाटीलनगरजवळ, खराडी-Kharadi) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अंजय रालु दासारी (वय 26, रा. थिटेवस्ती, खराडी) याला अटक केली आहे. ही घटना खराडी येथील नदी किनारी 6 जून रोजी सायंकाळी 6 वाजता घडली.(Pune Crime)
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अजय दासारी याने फिर्यादी यांच्या घराजवळ नदी किनारी विहीर खोदण्याचे काम (Well Digging Work) सुरु केले आहे. त्याने विहिरीतील दगड फोडण्यासाठी दगडामध्ये सुरुंग घेऊन स्फोटक पदार्थाने सुरुंग उडविला. त्याचे दगड फिर्यादीच्या घराच्या टेरेस व पाण्याच्या सिंटेक्स टाकीवर पडून टाकी फुटून नुकसान झाले. तसेच आज बाजूला राहणार्या लोकांच्या घरांचे पत्र्याचे छतावर दगड पडल्याने पत्रे तुटून नुकसान झाले. काही लोकांना दगड लागून मुका मार बसला. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Web Title :- Pune Crime | Damage to houses due to rock blasts due to mine blast for riverine wells; The water tank burst in the incident in Kharadi, some people were injured due to stones
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Indian Railways | रेल्वेने या मोठ्या बातमीचे केले खंडन, म्हटले – ‘विश्वास ठेवू नका, अन्यथा होईल पश्चाताप’
- Maharashtra Legislative Council Elections 2022 | विधान परिषदेसाठी पंकजा मुंडेंचा पत्ता कट ! भाजपकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर
- Pune Crime | एक्सगर्लफ्रेंडचा मोबाईल चोरुन त्यावरुन अश्लिल फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी
- RBI Hike Repo Rate | कर्जे महागणार ! आरबीआयकडून रेपो दरात 50 बेसिक पॉईंटची वाढ
- HSC 12th Result 2022 | बारावीचा निकाल जाहीर ! यंदाही कोकण विभागानं मारली बाजी; 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण