पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | मागील काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाकडून (SS Cell, Pune) छापे टाकले जात आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवारी (दि.3) मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर (Gambling Den) छापा टाकून 26 जणांवर कारवाई केली आहे. तसेच एक लाखाचा (Pune Crime) मुद्देमाल जप्त केला आहे.
मुंढवा पोलीस ठाण्याच्या (Mundhwa Police Station) हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांना समजली. त्यानुसार पोलिसांनी पाळत ठेवून छापा टाकला. त्यावेळी काही लोक बेकायदेशीर पैसे लावून जुगार खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी 25 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 1 लाख 3 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या प्रकरणी जुगार खेळताना आणि खेळवताना ताब्यात घेण्यात आलेले
आणि एक फरार आरोपी अशा एकूण 26 जणांवर मुंढवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी कायद्यांतर्गत
(Maharashtra Gambling Prohibition Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाई करीता मुंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Web Title :- Pune Crime | Crime branch raids gambling den in Mundhwa police station limits, action taken against 26 people
हे देखील वाचा :
Maharashtra Politics | उध्दव ठाकरे आमच्या निवेदनाची साधी दखलही घेत नव्हते; जोगेंद्र कवाडेंची टिका
Anil Parab | अनिल परबांना ईडीचा दणका; 10 कोटींची मालमत्ता जप्त