पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल (Builder Atul Goyal) यांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मोबाईल क्रमांकाचा (Mobile Number) वापर करुन 20 लाखाची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा दाखल करुन सहा आरोपींना अटक (Arrest) केली (Pune Crime) होती. अटक करण्यात आलेला आरोपी सुनिल उर्फ बाळा गौतम वाघमारे याला गुरुवारी (दि.27) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस पाटील (First Class Magistrate C.S. Patil) यांनी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. अशी माहिती आरोपीचे वकील अॅड. नितीन भालेराव (Adv. Nitin Bhalerao) यांनी दिली.
नवनाथ भाऊसाहेब चोरामले (रा. मु.पो. शिरसवाडी, वाढे-वोल्हाई ता. हवेली), सौरभ नारायण काकडे (रा. माळवडी, हडपसर), सुनिल उर्फ बाळा गौतम वाघमारे (रा. मु.पो. तारमाळा रोड, थेऊर), किरण रामभाऊ काकडे (रा. दत्तनगर, थेऊर), चैतन्य राजेंद्र वाघमारे (रा. संस्कृती कॉलनी, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (रा. मु.पो. शिरसवाडी, वाढे-बोल्हाई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सुनिल उर्फ बाळा गौतम वाघमारे (Sunil alias Bala Gautam Waghmare) याने अॅड. नितीन भालेराव यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. (Pune Crime)
आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, नवनाथ चोरामले याच्या आजोबांनी फिर्यादी अतुल जयप्रकाश गोयल यांना जामीन विकली होती. या जमिनीचा वाद सिव्हिल कोर्टात (Civil Court) सुरु आहे. फिर्यादी यांनी नवनाथ चोरामले याच्या इतर नातेवाईकांबरोबर सोबत सेटलमेंट केली होती. परंतु नवनाथ चोरामले यांनी कोर्टात दावा सुरु ठेवला होता. त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपी नवनाथ चोरमले यास सेटलमेंट करण्यासाठी त्यांचे ऑफिस मध्ये बोलवले होते.
आरोपी सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे हा नवनाथ चोरामले याचा मित्र असल्याने तो त्याठिकाणी गेला होता. यामध्ये त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच भादवी चे कलम 386 लागू होत नसल्याने आणि त्या प्रकारचा पुरावा तपासी अधिकाऱ्यांनी (Investigating Officer) न्यायालयात सादर केला नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.एस पाटील यांनी आरोपीचा 15 हजार रुपये रकमेच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
तसेच आरोपीला प्रत्येक रविवारी 9 ते 12 या वेळेत बंडगार्डन पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहे. आरोपीच्या वतीने अॅड. नितीन भालेराव व अॅड. अजय गुरव (Adv. Ajay Gurav) यांनी काम पाहिले. या प्रकरणातील सर्व आरोपींना आज जामीन मंजूर झाला आहे.
Web Title :- Pune Crime | Bail granted to accused seeking ransom of Rs 20 lakh in Ajit Pawar’s name
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update