पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | कस्टमचा माल आणून त्याची विक्री करुन व्यवसाय करण्यासाठी गुंतविलेल्या 30 लाख रुपयांचा कोणताही मोबदला न दिल्याने तरुणाने पैसे परत मागितले. त्यावरुन मित्रानेच चाकूने गळ्यावर वार करुन खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याची घटना हडपसरमधील रवीदर्शन येथे घडली. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल करुन सचिन दिलीप होले (वय 34, रा. ससाणेनगर, हडपसर) याला अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याप्रकरणी शादाब अमानुल्ला शेख (वय 36, रा. सय्यदनगर, महम्मदवाडी रोड, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. होले याने शेख व त्यांच्या मित्रांना आपण जेएनपीटी येथून कस्टमचा माल घेऊन त्यांची विक्री करु. जो काही नफा होईल ते सगळे मिळून वाटून घेऊ, असे सांगितले. त्याने शेख व त्यांच्या मित्रांकडून 29 लाख 90 हजार रुपये घेतले. मात्र, त्याचा कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला नाही. तेव्हा शेख यांनी होले याच्याकडे त्यांनी गुंतविलेले पैसे परत मागितले. तेव्हा होले याने त्यांना मेसेज करुन सय्यदनगर रेल्वेगेटजवळ शनिवारी सकाळी बोलविले. त्यानुसार शेख हे तेथे सकाळी पावणेअकरा वाजता गेले. तेथून त्यांना रवीदर्शन येथे नेऊन त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात शेख हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पडसळकर तपास करीत आहेत.
Web Title :- pune crime attempt to murder of friend for money in hadapsar area
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 204 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Tokyo Olympic 2020 | भारताचा स्टार भालाफेक नीरजने लिहीला सुवर्ण इतिहास