पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरातील (Manikbaug, Sinhagad Road) फुलपरी या स्वीट मार्टच्या मालकास फुकट काजुकतली दे, फुकट काजु कतली दिली नाहीतर तुला गोळया घालीन (Firing In Pune) अशी धमकी देवून फायरिंग करून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याची घटना सोमवारी घडली. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 8 तासात सिंहगड रोड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर दुसर्या अल्पवयीन युवकास ताब्यात घेण्यात आले आहे. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुरज ब्रम्हदेव मुंढे Suraj Brahmadev Munde (23, रा. घर नं. 2/44, साईनगर दत्तमंदिराचे मागे, माणिकबाग, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी व्यापारी आणि फुलपरी स्वीट मार्टचे मालक जोधाराम धिासाजी चौधरी (50, रा. रक्षालेखा सोसायटी, बिल्डींग नं., बी-1, प्लॅट नं. 12, दत्तवाडी) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. दि. 19 डिसेंबर रोजी चौधरी हे त्यांच्या स्वीटमार्टमध्ये असताना अटक आरोपी आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने त्यांना फुकट काजुकतली दे, फुकट काजु कतली दिली नाही तर तुला गोळया घालीन (Attempt To Murder) अशी धमकी दिली होती. चौधरी यांनी फुकट काजु कतली देण्यास नकार दिला असता आरोपीने चौधरी यांच्या दिशेने 2 ते 3 वेळा फायरिंग करण्याकरिता पिस्तुलचा ट्रिगर दाबला. पिस्तुलमधुन एक राऊंड खाली पडला. (Pune Crime)
गुन्हयाच्या तपासामध्ये उपनिरीक्षक स्वप्नील लोहार (PSI Swapnil Lohar) , पोलिस अंमलदार अमित बोरडे, शिवाजी क्षिरसागर, सागर शेडगे यांनी स्वीट मार्टमधील सीसीटीव्ही कॅमेर्याची पाहणी केली. आरोपीच्या वर्णनावरून अवघ्या 8 तासात आरोपी निष्पन्न करून त्याला अटक केली. आरोपीला मंगळवारी रात्री 11 वाजता अटक करण्यात आली आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदारास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) , पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Jt CP Sandeep Karnik), अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
उपायुक्त सुहेल शर्मा (Suhail Sharma IPS), सहाय्यक आयुक्त सुनिल पवार (ACP Sunil Pawar),
वरिष्ठ निरीक्षक शैलेश संख्ये (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पो.नि. (गुन्हे) जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar), उपनिरीक्षक स्वप्नील लोहार,
पोलिस अंमलदार अमित बोरडे, शिवाजी क्षीरसागर, सागर शेडगे, संजय शिंदे, विकास बांदल, राजु वेगरे,
सुनिल चिखले, गौतम किरतकुडवे, गणेश झगडे यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Attempt to kill a merchant in Manikbagh by firing; The accused was arrested by the Sinhagad Road Police within 8 hours
हे देखील वाचा :
Nana Patole | खोटारडेपणा अन् चेष्टा हाच भाजपचा खरा चेहरा – नाना पटोले
Amruta Fadnavis | ‘मी फक्त एकाच व्यक्तीला घाबरते, त्या म्हणजे…’ – अमृता फडणवीस
Amruta Fadnavis | ‘म्हणून मी आदित्य ठाकरेंना रेशमी किडा म्हणाले’ – अमृता फडणवीस