पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | डायस प्लॉटमध्ये माझ्या गँगचे राज चालणार असे म्हणणार्या जीएसटी गँगप्रमुखाला स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. डायस प्लॉट येथील किचन लॉलीपॉपचे घमेले घेऊन जात असताना विरोध केलेल्या सोनु शेखचा शोध घेत असताना टोळक्याने दुसर्या तरुणावर कोयत्याने वार (Pune Crime) करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) सहा जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
गोविंदसिंग पापुलसिंग टाक (वय २८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे या जीएसटी गँगच्या प्रमुखाचे नाव आहे. याप्रकरणी उझेर हसीन खान (वय १९, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. खान यांचे गुलटेकडीत रब्बानी केटअर्स हे दुकान आहे. गोविंदसिंग टाक हा पैसे न देता त्यांच्या दुकानातील ‘चिकन लॉलीपॉप’ चे घमेले घेऊन जात होता. त्याला सोनु शेख याने विरोध केला होता. या कारणावरुन २७ जुलै रोजी रात्री ९ वाजता टाक इतर पाच साथीदारांना घेऊन आला.
त्याने हातात कोयते व पालघन हवेत फिरवून परिसरात दहशत पसरविली.
फिर्यादी व त्यांचा नातेवाईक साहिल शेख हा त्यांना पाहून पळून जाऊ लागले.
तेव्हा टाक याने त्यांना अडवून सोन्या किधर है,
असे विचारुन साहिल यांच्या डोक्यात कोयता मारण्याचा प्रयत्न केला असता साहिल मागे सरकला.
त्यामुळे त्याचा वार हुकला.
ते पाहून साहिल पळून जाऊ लागल्यावर टाक याने त्याच्या पाठीमागे कोयत्याने वार करुन जखमी केले.
तसेच रुको, तुम नही बचोंगे असे मोठ मोठ्याने ओरडत फिर्यादी व साहील यांचे मागे धावत असताना फिर्यादी हे अंधारात टपरी खाली लपून बसले व साहिल हा आत गल्लीमध्ये पळत गेला.
त्या परिसरातील लोक व हातगाडीवाले देखील त्यांना बघुन पळत होते.
त्यानंतर गोविंदसिंग टाक हा डायस प्लॉट चौकात मोठया मोठ्याने ‘‘ये मेरा जीएसटी गँग है और उसका में भाई हुं, इस बस्ती में मेरा राज चलता है, और आगे चलता रहेगा, और मेरे खिलाफ जो पोलीस मे जायेगा उसको जिंदा नही छोंडुगा’’ असे ओरडत गोंविदसिंग व त्याचे साथीदार हातात कोयते व पालघन घेऊन नाचत होते.
सहायक पोलीस निरीखक ए. के. रसाळ (A.K. Rasal) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Arrest of the head of the GST gang who said that my Raj would run in the Dias plot Attempted murder by attacking the youth with a scythe
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
MP Sanjay Raut | UP मध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत ‘शिवसेना’ स्वबळावर लढणार