पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime Accident News | शेतीच्या कामासाठी गावी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरची धडक बसली. डंपर चालकाने दुचाकीसह त्यांना काही अंतर फरफटत नेले. यामध्ये गंभीर जखमी दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात (Pune Crime Accident News) बुधवारी (दि.26) दुपारी एकच्या सुमारास वाघोली येथील केसनंद फाट्यावर झाला. या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
अशोक मार्तंड काळे (Ashok Martand Kale) व वर्षा अशोक काळे Varsha Ashok Kale (रा. कसबा पेठ, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. तर डंपर चालक भास्कर पंढरीनाथ कंद (वय-51 रा. लोणीकंद) हा अपघातानंतर डंपर सोडून पळून गेला आहे. हा डंपर स्वप्नील भूमकर यांच्या मालकीचा आहे. अशोक काळे हे पोलीस सेवेतून निवृत्त (Retired Police) झाले असून ते सध्या शेतीच्या कामाकडे लक्ष देत होते. तर त्यांच्या पत्नी गृहिणी होत्या. शेतीच्या कामासाठी काळे दाम्पत्य हे राहू तालुक्यातील वाळकी या गावी जात होते. त्यावेळी हा अपघात झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे दाम्पत्य हे वाळकी या गावी शेतीच्या कामासाठी दुचाकीवरून जात होते. केसनंद फाट्यावर ते चौकातून राहू रोडकडे वळत होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरची दुचाकीला धडक (Dumper Hits Bike) बसली. हा अपघात एवढा भीषण होता की डंपरने काही मीटर अंतर दुचाकीसह दोघांना फरफटत नेले. डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वाघोली पोलीस चौकी (Wagholi Police Chowki) मध्ये असलेले पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह रुग्णावाहिकेतून रुग्णालयात पाठवून दिले. दरम्यान महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. हा अपघात सिग्नल वरच झाला. चौकात सिग्नलच्या आधी वाहनांचा वेग कमी असतो. मात्र डंपर भरधाव वेगात आल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime Accident News | pune accident wagholi kesnand retired police couple died crime news
हे देखील वाचा :