पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | फौजदारी व कौटुंबिक न्यायालयात (Family Court) केसेस सुरु असताना सासरी आलेल्या ५५ वर्षाच्या सुनेचा ८० वर्षाच्या सासर्यांनी विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार प्रभात रोडवरील (Prabhat Road, Pune) बंगल्यात शुक्रवारी घडला. (Pune Crime)
याप्रकरणी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे राहणाऱ्या ५५ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८२/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ८० वर्षाच्या सासर्यांवर विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासर प्रभात रोडला आहे. त्या पतीपासून वेगळ्या पिंपळे सौदागर येथे राहतात. त्यांच्यात फौजदारी न्यायालय व कौटुंबिक न्यायालयात ३ केसेस सुरु आहेत. त्या शुक्रवारी दुपारी सासरी नांदण्यास राहण्यासाठी आणि पोटगी घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या ८० वर्षाच्या सासर्यांनी अडवून अश्लिल शिवीगाळ करुन त्यांचा विनयभंग केला, अशी फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Web Title :- Pune Crime | 55 year old daughter in law molested by 80 year old father in law; A domestic incident at a luxury house on Prabhat Road pune crime news
हे देखील वाचा :
Pune Pimpri Crime | धक्कादायक ! मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सासूचा केला खून, सुनेला अटक
Vijay Shivtare On Sanjay Raut | संजय राऊत सिझोफ्रेनिया रुग्णासारखं वागताहेत – विजय शिवतारे
Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर